लोकसंवाद /- कणकवली.

ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली मध्यवर्ती संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुका प्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page