सावंतवाडी /-
कोकण रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर २८ ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोनुर्ली साखरमैना परिसरात घडली.याबाबतची माहिती रेल्वेस्थानकाचे ट्रॅकमन विनोद चव्हाण यांनी दिली आहे.त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सिद्धेश हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज आहे.यात तो जागीच गतप्राण झाला.त्याचा मृतदेह सावंतवाडी कुटीर रूग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी दिली.याबाबतची खबर बेनीत फर्नांडिस रा.रोणापाल यांनी पोलीस दिली आहे.