✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्ग.

प्रतिभा हुल्याळकर यांच्या माध्यमातून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या मार्फत मालवण तालुक्यातील कट्टा परिसरातील हडपीवाडी, कावळेवाडी, कुसरवे येथील अंगणवाडीतील १०० मुलांना उत्तम दर्जाची स्वेटर वाटप करण्यात आले. याबाबत सौ हुल्याळकर यांचे अंगणवाडी मुले, पालक आणि अंगणवाडी कर्मचारी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा, हडपीवाडी, कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने हे वितरण करण्यात आले. वितरण प्रसंगी आशा स्वयंसेविकांच्या समन्वयक सौ नाईक यांनी सर्व बालक व पालक यांच्यावतीने प्रतिभा हुल्याळकर यांचे आभार मानले व सेवांगण आता नवजात बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवतेय याचा आनंद वाटतोय, असे सांगितले.

यावेळी महिलाना मार्गदर्शन करताना वैष्णवी लाड यांनी, प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकांना मायेची पाखरच घातली आहे. त्या बद्दल सर्वानी त्यांचे व ज्यांच्यामुळे ही मदत आपणास मिळाली त्या रोटरीयन रश्मी पाटील यांच्याविषयी कृतज्ञ राहायला हवे, असे आवाहन करताना सेवांगणच्यावतीने त्यांचे खूप आभार व्यक्त केले. सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यानी, श्रीमती हुल्याळकर यानी अत्यंत चांगल्या प्रतीची स्वेटर खास करून ग्रामीण भागातील बालकांसाठी दिली आहेत. त्यासाठी मुंबईहून कायमच मदत मिळवण्यासाठी तत्पर असणाच्या रश्मी पाटील यांनी मेहनत घेतली आहे. प्रतिभा हुल्याळकर व रश्मी पाटील यांचे आभार मानून त्यांनी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले.

यावेळी १०० बालकाना अंगणवाडी येथे जाऊन स्वेटर, कानटोपी, विजार व बिस्किट पुडा भेट देण्यात आला. या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, सौ नाईक, सौ ढोलम, रीटा डान्टस, अंगणवाडी सेविका वेंकर, आपा परब, श्री मिठबावकर, देवीदास गोंधळी, चंद्रकांत घोगळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page