✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या खारेपाटण संभाजी नगर (गुरववाडी) येथील जयश्री कृष्णा ढेकणे यांच्या मालकीच्या असलेल्या ग्रा प घर नं. – ६३ या बंद घराची अज्ञात चोराकडून घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरफोडी करून आतील कापटाची व इतर समानाची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती खारेपाटण संभाजी नगर येथील रहिवासी व ग्रा प सदस्य महेंद्र गुरव यांनी आज दिली. खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या जयश्री कृष्णा ढेकणे याचे कुटुंब मुलगा प्रकाश कृष्णा ढेकणे पत्नी मुले ही सध्या ब्रह्मपुरी नवीन शिक्षक कॉलनी खारेपाटण येथे राहतात. तर संभाजी नगर खारेपाटण येथील त्यांच्या मालकीचे घर सध्या बंद होते. मात्र या बंद घर असल्याचा अज्ञात चोरट्यानी फायदा घेत काल मध्यरात्री घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील असलेल्या कपाटाची तोडफोड करून आतील सामान घरभर फेकून दिले. तसेच कपाटातील कपडे बाहेर काढून फेकून दिले. ही बाब दुसऱ्या दिवशी शेजराच्या नागरिकांच्या लक्षात येताच घरमालक यांचे चिरंजीव प्रकाश ढेकणे यांना याबाबत तातडीने माहिती देण्यात आली.

तर खारेपाटण पोलीस स्टेशन ला देखील या घरफोडी घटनेची माहिती देण्यात आली. खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे, पराग मोहिते हे सदर घटनेचे अधिक तपास करत आहेत. दरम्यान खारेपाटण गावात सलग या आठवड्यात ही दुसरी बंद घरफोडीची घटना घडली असून खारेपाटण संभाजी नगर या भागातच पुन्हा ही घरफोडी व चोरीची घटना घडली असल्यामुळे खारेपाटण मधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. तर अज्ञात चोराकडून खारेपाटण मध्ये सातत्याने घडत असलेल्या बंद घरफोडी चोरीच्या सत्राला पोलीस प्रशासनाकडून चाप लावला लावला जाणार आहे का?, असा सवाल सर्व सामान्य नागरिकांमधून आता व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page