सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार.;प्रजित नायर

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी.

जलजीवन मिशनच्या माध्यमातुन 55 लिटर शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरीता जिल्हा परिषद कठिबध्द आहे. शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी देणे ही आपली जबाबदारी असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची एकाचवेळी जैविक तपासणी करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी बोलताना केले आहे.अंतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट किटव्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी नमुने तपासणी प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर आदी उपस्थित होते. यावेळी रासायनिक पाणी नमुने तपासणी किट वितरणाचा शुभारंभ नायर यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page