लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.या निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्माननीय श्री सी डी चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून तर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सन्माननीय श्री विलास पालकर यांची उपाध्यक्ष 10 विरुद्ध 5 अशा बहुमताने निवड झाली.
अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार होते एक चंद्रकांत चव्हाण विरुद्ध दिनेश म्हाडगुत चंद्रकांत चव्हाण यांना दहा मते तर दिनेश म्हाडगुतना पाच मते मिळाली.उपाध्यक्ष पदासाठी विलास पालकर विरुद्ध सुजित गंगावणे विलास पालकर यांना दहा मते तर सुजित गंगावणे यांना पाच मते मिळाली अध्यक्ष उपाध्यक्ष मतांनी विजयी घोषित केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर व उर्मिला यादव यांनी काम पाहिले
सर्व समावेशक शिक्षण सहकार पॅनलचे निवडून आलेले संचालक सुनील नाईक विद्यानंद पीळणकर ,उमेश सावंत ,श्रद्धा कुलकर्णी ,निखिल ओरोसकर ,गिरीश राऊळ,गिरीश गोसावी,दीपक तारि यांनी अभिनंदन केले.
कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी. डी. चव्हाण व अध्यक्षपदी विलास पालकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अध्यक्ष संजय वेतुरेकर,माणिक पवार,संदीप काळे ,प्रशांत आडेलकर,प्रसाद पडते,संजय वेतुरेकर,सुशील कुमार कडुलकर यांनी अभिनंदन केले.
