मालवण /-

तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व. सुनील मलये यांचे सहकारी व आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत.

तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.या पार्श्वभूमीवर मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांची भाजप पुरस्कृत उमेदवारांनी निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत पॅनेल आणि महाविकास आघाडी पॅनेल अशी थेट निवडणूक होणार आहे.अनेक विद्यमान संचालकांचा भरणा तसेच तालुक्यातील सोसायट्यांवर असलेले वर्चस्व पाहता भाजपा पुरस्कृत उमेदवार ही निवडणूक सहजपणे जिंकतील असा विश्वास उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खासदार निलेश राणेंनी विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page