सिंधुदुर्गात “निलक्रांती”ची सर्वात,विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्यविद्यालय होणार सुरू..

कणकवली /-


सिंधुदुर्गात आता खऱ्या अर्थाने निलक्रांती होणार असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्य महाविद्यालय सुरू होणार आहे.अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, मासेमारी कोकणात आणि मत्स्यविद्यापीठ विदर्भात नागपूर ला अशी आजवर स्थिती होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. 22 ऑक्टोबर 2022 ला मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मी मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्गात सुरू करण्याची मागणी मी केली होती. त्यानंतर तात्काळ राज्य सरकारने सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून लवकरच सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू होईल.हे कॉलेज डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांच्याशी संलग्न असणार आहे. या कॉलेज साठी 26 हेक्टर जागा आवश्यक होती.देवगड गिर्ये गावात जागा उपलब्ध झाली असून भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली यांनी सिंधुदुर्गात मत्स्यमहाविद्यालय सुरू करण्यास प्रथमदर्शनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण वेंगुर्ले या सागरी किनारपट्टीवर मासेमारी सुरू असते.महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोकणावर सातत्याने अन्याय केला. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोकण विकासासाठी असंख्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


या पूर्वी महाविकास आघाडी सरकार मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन निधी देण्याची माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी पोकळ घोषणा केली.मात्र शिंदे फडणवीस सरकार ने प्रत्यक्ष 50 हजार प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कोस्टल हायवे बाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. फोंडाघाट बाजारपेठेतील रखंडलेलें रस्ता रुंदीकरण शिंदे-फडणवीस सरकार येताच सुरू होत आहे.यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच फोंडाघाट बाजारपेठ रस्त्याच्या रुंदीकरनाला सुरुवात होणार आहे.एकंदरीत शिंदे- फडणवीस सरकार मुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात झाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page