सिंधुदुर्ग /-

आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२१ -२२ लेखाशीर्ष कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंध अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग करीता कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील आरोग्य केंद्राना कॉन्स्स्ट्रेटर्स पुरविण्यासाठी सुमारे ११ लाख ५१ हजार रुपये एवढ्या कामाच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णाची संख्या अत्यंत कमी झाल्याने कॉन्स्स्ट्रेटरची आवश्यकता नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांच्या दि. ८ जून २०२२ च्या पत्रानुसार कळविल्यामुळे सदर कामात बदल करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील प्रमुख एकूण ८ प्रा. आ. केंद्रांना संगणकासह प्रिंटर पुरविण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडे आमदार नितेश राणे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या कणकवली व देवगड तालुक्यातील प्रत्येकी ३ तर वैभववाडी तालुक्यतील २ प्राथमिक आरोग्य केंद्रसह एकूण ८ प्रा. आ. केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण, फोंडा, वरवडे व देवगड तालुक्यातील पडेल, शिरगाव, फणसगाव तर वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, वैभववाडी अशा एकूण ८ प्राथमिक आरोग्य केंद्राना संगणकासह प्रिंटर साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे. यावर निधी खर्च करणेबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा सचिव जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांना आमदार नितेश राणे यांनी नुकतेच दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page