कुडाळ/-
दशावतार नाट्यकृतीतून महिला या श्रेष्ठ आहेत महिलांवर अन्याय होऊ देणार नाही स्त्री ही माता भगिनी अर्धांगिनी आहे हा संदेश देण्यात आलान पथनाट्यातून विधवा प्रथाचा संदेश देण्यात आला लक्षवेधी नृत्याविष्कारातून विठ्ठल रखुमाईच्या नामघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला औचित्य होते कुडाळ पंचायत समितीच्या वतीने विधवा प्रथा बंद चाल तू पुढे! मिशन वात्सल्य… श्रावणमेळा. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
महालक्ष्मी हॉल येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले होते सकाळच्या सत्रात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वललनाने उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राजापूर आमदार राजन साळवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर संजय कापडणीस तहसीलदार अमोल पाठक गटविकास अधिकारी विजय चव्हाण कृषी अधिकारी अश्विनी घाटकर माजी सभापती नूतन आईर संदेश किजवडेकर गीता पाटकर बाळकृष्ण परब महाराष्ट्र राज्यातील पहिल्या तृतीय पंथी शिक्षिका रिया आळवेकर कुडाळ तालुक्यातील महिला वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.
आमदार वैभव नाईक म्हणाले पंचायत समिती कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सर्वांच्या सहकार्याने विधवा प्रथा बंद चाल तू पुढे! मिशन वात्सल्य… श्रावणमेळा. हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला समाजात महिलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आज समाजात ज्या काही प्रथा रूढी परंपरा आहेत त्याबाबत जनजागृतीचा कुडाळ पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम आहे गतवर्षी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने श्रावणमेळा अंतर्गत दशावतार, भजन, किर्तन, ठाकर-आदिवासीकला , चित्रकथी, धनगरी नृत्य, फुगडया इत्यादी लोककलांना उर्जितावस्था आणण्यासाठी , त्यांचे संवर्धन होण्यासाठी तसेच या लोककलांच्या माध्यमातून ज्यांनी समाजप्रबोधन केले अशा कुडाळ तालुक्यातील वृद्ध कलाकारांची लोककला जनतेसमोर यावी , त्यांचा आदरसत्कार करणे , सन्मान करणे व त्यांच्यातील कला सादरीकरणास व्यासपिठ निर्माण करणेच्या उद्देशाने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी , क्रांती दिन तसेच आदिवासी लोककला दिनाचे औचित्य साधून 174 कलाकारांचा श्रावणमेळा कलाकारांसाठी ख-या अर्थाने स्नेहमेळा , चैतन्यमेळा ठरला होता असे सागितले.
गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणेबाबत महाराष्ट्र शासनाने 17 में 2022 रोजी शासन निर्णय घेतला. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना कुडाळ तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव घेणेसाठी आवश्यक ती प्रचार-प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून समाजासमोर जाऊन सकारात्मक निर्णय घेतले व ठराव एकमुखाने अगर बहुमताने पारित केले त्यास अनुसरून एकत्रित तालुक्याचा विधवा प्रथा निर्मूलनाबाबतचा ठराव होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला 600 विधवा महिला, 300 सुहासिनी महिला, 100 कुमारिका महिला अशा किमान 1000 महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले होते मात्र त्याच्या दुप्पट ही उपस्थिती लाभली आहे सदर कार्यक्रमात अकाली आलेले वैधव्य आणि अनिष्ट रुढी, परंपरा यांच्यावर विविध लोक कला आणि स्कीट दवार आसूड ओढणारे महिलांचे हृदयस्पर्शी कार्यक्रम, वैधव्याने खचून न जाता नव्या उमेदीन तू चाल पुढे. ऊर्जा आणि उमेद देणारे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वैधव्यामुळे अनिष्ट रुदीना बळी पडलेल्या अभागिनीचे काळीज पिळवटून टाकणाऱ्या व्यथाही या कार्यक्रमात ऐकवल्या गेल्या . वैधव्य आले तरी संघर्ष करीत अनिष्ट रूढी झुगारून खंबीर उभ्या राहिलेल्या विरगणाच्या यशोगाथाचे सादरीकरण, मिशन वात्सल्य, अंतर्गत योजनाचे लाभार्थी निवड करुन त्याचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत, कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचे ठराव केले आहेत.