कुडाळ /-
एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयात कै. सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै. रामचंद्र नीळकंठ ठाकूर पारितोषिक वितरण समारंभाच्या (राधारंग फाउंडेशनच्या पदाधिकारी बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचारी तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती. अरुणा सामंत व रोटरी क्लबच्या पदाधिकारी , महाराष्ट्र बँक बँकेच्या निवृत्त कर्मचारी सौ. गोवेकर मॅडम यांच्या उपस्थित संपन्न झाला.
कै. सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृती पारितोषिक योजनेद्वारे दरवर्षीप्रमाणे इयत्ता पाचवी ते नववीतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली. सन 2021- 22 मधील गुणवंत विद्यार्थी इयत्ता पाचवी- 1)कुमार. साटेलकर सुयश सद्गुरु- इयत्ता सहावी 1)कुमारी .सामंत दिया निलेश इयत्ता सातवी-1) कुमार. मेस्त्री प्रज्योत विजय इयत्ता आठवी-1) कुमारी. बुरुड महती रवींद्र इयत्ता नववी-1) कुमार .नाईक आदित्य रमाकांत तसेच कै.श्री. रामचंद्र नीळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिक योजनेद्वारे दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी ते बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली. इयत्ता दहावी-1) कुमारी पडते देविका गिरिधर इयत्ता अकरावी -विज्ञान कुमारी. माडये वृषाली शरद इयत्ता अकरावी- वाणिज्य 1) कुमारी नाईक नेहा प्रशांत इयत्ता अकरावी -कला 1)कुमारी. कुंभार गौरी जनार्दन इयत्ता बारावी विज्ञान-1) मेस्त्री गायत्री संदीप इयत्ता बारावी वाणिज्य-1) सावंत निकिता सुरेश इयत्ता बारावी कला -1)उसपकर साहिल संजय तसेच इयत्ता दहावीतील 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी 1)सार्थ सच्चिदानंद पाटकर 2)मयुरी ठाकूर 3)ज्ञानेश्वरी परब 4)भाग्यश्री आजगावकर 5)निकिता लाड 6)देऊ खांबल 7)दीक्षा गावंडे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती अरुणा सामंत, प्रमुख अतिथी सौ. गोवेकर तसेच संस्था कार्याध्यक्ष श्री. समाधान परब ,उपाध्यक्ष श्री. सामंत डी.ए, संस्था सचिव श्री. सुधीर ठाकूर, संस्था सदस्य श्री. दशरथ नार्वेकर, श्री. बाबा तळवडेकर ,माजी कार्याध्यक्ष श्री. रेडकर गुरुजी, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. पी. कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कै. सौ. सुहासिनी ठाकूर या विद्यालयाच्या कर्तबगार विद्यार्थिनी होत्या त्यांच्या सारखेच कष्ट करा यश मिळवा व भविष्यात विद्यालयाकडे लक्ष द्या अशा शब्दात संस्था सचिव श्री .सुधीर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन केले. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती आदरणीय श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण देऊन महिला विविध क्षेत्रात कसा ठसा उमटवतात त्याचे हे प्रतीक आहे. आत्मविश्वासाने यश मिळवा ,आवड जपा, ध्यास घ्या, जिज्ञासू वृत्तीने उत्तरे शोधा यश तुमचेच आहे .अशा शब्दांत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. गोवेकर महोदया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, निर्धार करा, उत्तमोत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. असा संदेश संस्था उपाध्यक्ष श्री. डी.ए. सामंत यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात दिला.
प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. डी.डी. सामंत यांनी कै. सुहासिनी रामचंद्र ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारे भाषण ओघवत्या शैलीत केले. प्रशालेची 2021- 22 मधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी. गायत्री संदीप मेस्त्री हिनेही जेवढा संघर्ष मोठा तेवढे यश मोठे, सातत्यपूर्ण अभ्यास, एकाग्रता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अशा शब्दात मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .एस. पी .कोरे यांनी केले. तर सूत्र संचालन सौ.यज्ञा साळगावकर ,आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री आर. एस. हंजनकर सर यांनी केले.
