परुळे /-
कुशेवाडा मांजर्डे वाडी येथील सौ.सुहासिनी दत्तात्रय सामंत(८२) यांचे राहत्या घरी निधन झाले त्या माजी शिक्षिका स.का. पाटील विद्यामंदिर केळुस व अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे येथून सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांनी केळूस हायस्कूल येथे दीर्घकाल सेवा बजावली त्यानंतर काही काळ परुळे हायस्कूलमध्ये कार्यरत होत्या. त्याचा सर्वच विषय चांगल्या पद्धतीने शिकवित असल्याने विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. विशेष करून त्यांना गणित विषयाचा व्यासंग आणि हातखंड होता. या दुःखद बातमीमुळे विद्या प्रसारक विस्वस्त मंडळ परुळे या संस्थेने आपल्या परुळे व केळुस या दोन्ही शाळांमधे दुखवटा जाहीर करून श्रद्धांजली वाहून शाळा सोडण्यात आल्या त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे परुळे व केळुस हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय सामंत यांच्या त्या पत्नी होत तर कुशेवाडा उपसरपंच व आदिनारायण सोसायटी चेअरमन निलेश सामंत यांच्या मातोश्री होत
