कुडाळ/-

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कुडाळ व कन्याशाळा कुडाळ येथे पाट्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक ५ जुलै २०२२ रोजी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कुडाळ नंबर १ येथील नऊ गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा कुडाळ येथील दहा गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या एक पाटी गरजू विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमांतर्गत पाटी वाटप करण्यात आले. (टीप : गरजूंना मदत करताना फोटो काढणे योग्य वाटत नसल्याने प्रत्यक्ष वाटपाचा फोटो काढण्यात आलेला नाही.)

या उपक्रमासाठी पाटीसाठी दोडामार्ग येथील ह.भ. प. योगाचार्य नवनाथ महाराज बोराडे लातूरकर यांची कन्या स्वानंदी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १३ पाट्यांचे सौजन्य केले तर महादेवाचे केरवडे येथील श्री मिलिंद अनंत जाधव यांनी आपल्या आई सौ. सुनंदा अनंत जाधव यांच्या स्मरणार्थ ६ पाट्यांचे सौजन्य केले. दोघांचेही दुर्ग मावळा परिवाराकडून खूप खूप आभार

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक पाटी देऊन सहकार्य करू शकता. (पाटी सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना पाटी वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवा. ९८६०२५२८२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page