कणकवली /-

नॅशनल महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित समस्या सुटत • नाहीत जमिनी गेलेल्या जमीनमालकांना मोबदला मिळत नाही व महामार्ग वाहतुकीस योग्य होत नाही तोपर्यंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना टोलमाफी दिल्याशिवाय टोलनाका सुरू करू देणार नाही. तसा पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा प्रयत्न केलास गाठ शिवसेनेची आहे असा इशारा आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापुरचे अधिकारी पी. डी. पंदरकर यांना दिला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टोलवसुलीला विरोध केला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश परकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना समन्वयक राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, शहरप्रमुख आदित्य सापळे, योगेश मुंज, अजित काणेकर, रिमेश चव्हाण, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश राणे, गौरव हर्णे, रामदास विखाळे, सरपंच प्रमोद कावले, सदानंद मोरे, नितीन धुरी, रवी ठाकूर, मंगेश राणे, रोहित राणे, बाबू केणी, आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page