कुडाळ /-

“बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही नाविन्यपूर्ण उपक्रमाची खाण आहे : प्राचार्य का.आ.सामंत. “ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञान ,कला, क्रीडा, सामाजिक भान आणि ग्लोबल थिंकिंग ही जीवनाची सप्तपदी आहे आणि याचा सर्वांनी आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी पाठ्यपुस्तकाच्या वाचना सोबतच अवांतर वाचनाला तरुणांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले पाहिजे” असे उद्गार कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय श्री. का. सामंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.बॅरिस्टर नाथ पैं नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.”बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही एक नाविन्यपूर्ण उपक्रमांची खाण आहे आणि सदोदित प्रगतीपथावर असलेले हे एक शिक्षण संकुल आहे. कोरोना काळात या संस्थेने समाजासाठी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे आहे आणि ते समाजासाठी आदर्शवत आहे “. असे गौरवोद्गार माननीय श्री सामंत यांनी आपल्या भाषणात काढले. या वेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, कॉलेज ऑफ फिजीओथेरपी प्राचार्य डॉ. सुरज शुकला, बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळच्या प्राचार्या माननीय सौ. मीना जोशी तसेच उपप्राचार्या सौ .कल्पना भंडारी हे मान्यवर उपस्थित होते. संस्था अध्यक्ष .उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश, केलेली प्रगती याबद्दल त्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .तसेच नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. मीना जोशी यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डाॅ.सुरज शुक्ला यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. हा. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये संपन्न झाला सकाळच्या सत्रामध्ये वर्षभरात महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या वार्षिक परीक्षांमध्ये उत्तम यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला तर संध्याकाळच्या सत्रांमध्ये आयोजित सांस्कृतिक अंतरंग- २०२२ कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम संपन्न झाले.या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार माननीय श्री .अरुण दाभोळकर उपस्थित होते.त्यांनी “परिचर्या क्षेत्र हे एक व्रत आहे आणि या क्षेत्रामध्ये अजूनही स्त्रियांचे प्रभुत्व आहे कारण इतरांची सेवा करण्यासाठी आवश्यक असणारे ममत्व आणि माया ही निसर्गाने स्त्रीला उपजत दिलेली देणगी आहे.”असे परिचर्या क्षेत्राविषयी असे मत त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर तसेच सौ .सुमन करंगळे -सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. नेहा महाले यांनी मानले.. या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. वैशाली ओटवणेकर, सौ. शांभवी आजगावकर, पूजा म्हालटकर, प्रियांका माळकर, रेश्मा कोचरेकर, गौतमी माईणकर, प्रथमेश हरमलकर ,प्रसाद कानडे तसेच इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page