वेंगुर्ला /-

      वेंगुर्ले तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी वादळी वारा पावसाने वायंगणी बागायतवाडी येथील अरुण गोविंद मांजरेकर वगैरे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून ४९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान घरातील व्यक्तींना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.यावेळी वायंगणी सरपंच सुमन कामत,ग्रामसेवक संदिप गवस,तलाठी मिनल चव्हाण,कृषी सहाय्यक लाडू जाधव,कोतवाल पांडुरंग सरमळकर आदीनी पाहणी केली.संबंधित घरावर पडलेले झाड बाजूस करण्यास ग्रामस्थ चंद्रशेखर येरागी, नरहरी तोरसकर तसेच अरुण मांजरेकर, बाबुराव मांजरेकर, सूर्यकांत मांजरेकर, लवूराज मांजरेकर यांनी सहकार्य केले.तसेच तालुक्यातील म्हापण खवणे मळई येथील नंदकिशोर बापू पालकर यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून ६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच 
पावसामुळे विद्युत वितरणचेही नुकसान झाले आहे.तालुक्यातील रेडी सेक्शन मध्ये २, पेंडूर येथे ३ व कामळेविर येथे ३ असे एकूण ८ विद्युत पोल तुटून नुकसान झाले आहे.काही ठिकाणी विद्युत तारा तुटूनही नुकसानी झाली.
दरम्यान जिल्ह्यासह तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व पशुपालक वर्गाचे नुकसान झाले आहे.शेतकरी वर्गासह बागायतदार हवालदिल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page