वेंगुर्ला /-

वेंगुर्ला रोटरी अंतर्गत येणा-या विविध क्लब यांची सन २०२१-२२ साठीची नूतन कार्यकारिणी जाहिर केली आहे. तर जिल्ह्यामध्ये रोटरॅक्टचळवळ गतिमान करण्यासाठी मागील वर्षीपासून ‘सिधुदुर्ग झोन‘ची निर्मिती केली आहे. याच झोनच्या सन २०२१-२२ झोनल रिप्रेझेंटेटीव्हपदी रोटरॅक्टर निहाल विष्णू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रोटरी सिंधुदुर्गचे राजेश घाटवळ, वेंगुर्ला रोटरी मिडटाऊन प्रेसिडंट भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, व्हाइस प्रेसिडंट वसंतराव पाटोळे, रोटरॅक्ट कमिटी चेअरमन नितीन कुलकर्णी, आय.पी.पी.झेड.आर.आर.स्वप्निल परब यांच्या उपस्थितीत पार पडला. वेंगुर्ला रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या प्रेसिडंटपदी दुर्गेश सुरेश पाटील, सेक्रेटरीपदी अंजली कासकर यांची तर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंटपदी साहिली निवावे आणि सेक्रेटरीपदी नेहा गावडे यांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होमिओपॅथीकच्या उपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे, आय.पी.पी.सेक्रेटरी श्रुती शेडगे, रोटरॅक्टर प्रितिश लाड यांचे सहकार्य लाभले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याविषयक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सिंधुदुर्ग झोन प्रमुख निहाल नाईक तसेच प्रेसिडंट दुर्गेश पाटील आणि प्रेसिडंट साहिली निनावे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page