कुडाळ /-
तोक्ते चक्रीवादळ यामुळे निवती गावातील सर्वच विहिरीचे पाणी हे पिण्यास योग्य नव्हते,सर्वच विहिरीत खारे पाणी गेल्याने नागरीकानां पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून भाजपच्या वतीने आज रविवारी ३० मे .रोजी निवती गावात टॅकरने पाणी पुरवठा करण्यात आला आणि निवती गावात नुकसान झालेल्या लोकांनां सिमेटच्या पत्र्याचे देखील वाटप आज करण्यात आले.यावेळी माजी सभापती निलेश सामंत नाथा मडवळ भाजप युवामोर्चाचे प्रसाद पाटकर ,निवती ग्रामस्थ उपस्थित होते,निवती ग्रामस्थांनी मानले भारतीय जनता पक्षाचे मानले आभार.