कुडाळ /-
सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लसीकरण ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येते.प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीकरणाला आरोग्य विभागाने चालू करण्यास परवानगी दिली.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना आरोग्य केंद्रात येण्यासाठी 30 ते 40 किलोमीटर प्रवास करावा लागतो. लॉकडाउनच्या काळात बस सेवा बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या गैरसोयीचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित आरोग्य विभागाने लसीकरण उपकेंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करावे. लोकांना सोयीस्कर होईल गर्दी कमी होईल व येण्याचा जाण्याचा प्रवास कमी होईल.तसेच १मे पासून अठरा वर्षावरील लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होईल यासाठी मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र चालू केल्यात गर्दी कमी होईल.यासंदर्भात नागरिकांची समस्या कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे व कुडाळ तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनाही माहिती दिली.