वेंगुर्ला /-
वेंगुर्ले शहरांत कलानगर व पिराचीगल्ली भागात २२ कुटुंबांना संदेश निकम मित्रमंडळामार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. येथे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने शासनाच्या नियमांनुसार कंटेनमेंट झोन केलेल्या कलानगर व पिराचीगल्ली भागातील गरीब व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या २२ सर्वसामान्य कुटुंबांना १५ दिवसांच्या कालावधीत उपासमार होऊ नये, यासाठी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी संदेश निकम मित्रमंडळाने दरदिवशी लागणाऱ्या १५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य पॅकेज करून ते रविवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागाच्या नगरसेविका तथा संदेश निकम मित्रमंडळाच्या अध्यक्षा सुमन निकम व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी हे वितरण केले.यावेळी सदरच्या भागातील सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य वितरण प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रभाग ६ च्या दक्षता समिती अध्यक्ष प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, इंजिनियर गायकवाड, अभिजित गिरप, सामाजिक कार्यकर्ते संदिप मोबारकर, नरेंद्र आरोलकर यांच्या उपस्थितीत कलानगर येथील विकी फर्नाडीस, लुसी मेहता यांच्यासह संबधितांना अन्नधान्याच्या पॅकेजचे वितरण संदेश निकम मित्रमंडळाच्या अध्यक्षा सुमन निकम यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी वितरण केले.
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने व त्यात कलानगर आणि पिराचीगल्ली या भागात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने माणुसकीच्या नात्याने संदेश निकम मित्रमंडळामार्फत मित्रमंडळाच्या अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुमन संदेश निकम यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.