सिंधुदुर्गनगरी /-
कोरोना काळात आंतरराज्य आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ई पास आवश्यक असून अत्यावश्यक कालावधीसाठी संबंधितांनी पोलीस विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला परिपूर्ण अर्ज करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव आजच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेस द चेन अंतर्गत प्रवासी वाहतुकीवरील कठोर कारवाई करण्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून ई.पास तरतूद करण्यात आली आहे त्यासाठी आपला रितसर अर्ज संकेतस्थळावर करावा लागणार आहे ,सदर ई पास अतिशय जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधी आणि आवश्यक अंमलबजावणी तसेच अत्यावश्यक सेवा या कारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाकडून देण्यात येणार आहे मी पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा त्याबाबत परिपूर्ण माहिती बारावी सदर बाबत काही अडचणी असल्यास संबंधित पोलिस अधिकारी पोलीस स्टेशन आणि जिल्हा ई सुविधा केंद्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा जेणेकरून आपला प्रवास साठी सुलभ सुरक्षित सेवा देणे शक्य होईल असे कळविण्यात आले आहे . आंतर जिल्हा, जिल्हा अंतर्गत येणाऱ्यांसाठी आता पोलीस विभागामार्फत ई. पास सुविधा