कुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे

कुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे

कुडाळ/-

तालुक्यात दिवसेंदिवस वाढता कोरोना व्हायरसचा प्रसार जनतेमध्ये निर्माण झालेली घबराटीची परिस्थिती.याबाबत अनेक मान्यवरांनी या बाबत मांडलेली मते.कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सुचविलेले वेगवेगळे पर्याय या सर्वाच्या भावनांचा आदर करून कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने १६ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत एकमुखी जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याबद्दल कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा. संजय भोगटे व त्यांच्या सर्व टीमसह कुडाळ नगरपंचायतीचे अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील भोगटे यांनी केले.

कुडाळ तालूका व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनहितार्थ निर्णयाची अंमलबजावणी तालुक्यातील सर्व जनतेने करावी. व्यापारी संघटनेने घेतलेला निर्णय हा जनतेच्या हितार्थ आहे. त्याचे पालन करून कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी व्यापारी संघटनेला सहकार्य करून सोशल डिस्टन्शनचे पालन करा. मास्कचा वापर करा.महत्वाच्या कामाशिवाय विनाकारण बाहेर फिरू नका.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील भोगटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केले आहे.

अभिप्राय द्या..