मसुरे /-
जि.प.पूर्ण प्राथ. शाळा तिवरे खालचीवाडी येथे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदार सत्कार समारंभ तसेच विद्यार्थी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरपंच सौ.लतिका म्हाडेश्वर, उपसरपंच श्री.रविंद्र आंबेलकर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.किशोर गवस, शाळा व्य अध्यक्ष श्री.रामदास आंबेलकर, केंद्रप्रमुख सौ.जुहिली सावंत, सौ.विनिता गोसावी, श्री.दत्ताराम फोपे,श्री.रघुनाथ चव्हाण,श्री.संतोष वाळवे,प्रितगंध फाउंडेशनचे श्री.संतोष म्हाडेश्वर, मुख्याश्री.विजय शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रितगंध फाउंडेशनच्या वतीने ड़ामरे-तिवरे केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.जुहिली जयवंत सावंत यांनी कोविड कालवधीत शैक्षणिक उपक्रमांची माहिती शाळेपर्यंत पोहचवत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिले.मुलांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा निर्माण केली.शिक्षक वर्गात चेतना निर्माण करून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून केलेल्या कार्या बद्दल ‘आदिशक्ती पुरस्कार ‘प्रदान करण्यात आला. तिवरे खालचीवाडी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री.संदीप कदम यांनी मुलांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू न देता,’शाळा बंद ,शिक्षण सुरु’या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वातावरण निर्मिती केली.’थँक्स अ टीचर ‘मोबाइलद्वारे समूह शिक्षण संवाद’ऑनलाइन स्पर्धा ,वाचू आनंदे, अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रितगंध फाउंडेशन मुंबई तर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सा.फु.द.पा.योजनेंतर्गत शाळेचे १००%लक्ष्य साध्य करण्यासाठी सेवाभावी व त्यागी भावनेने मुलींचं पालकत्व स्विकारलेल्या श्री.दत्ताराम फोपे,(ट्रेकर मुंबई), श्री.शशिकांत तिरोडकर (कवी-मुंबई), श्री.विजय गोसावी (मानवतेचे वाहक-तिवरे), श्री.संदीप चव्हाण (तिवरे),श्री.राजेंद्र शां.गोसावी, (व्यावसायिक-तिवरे),श्री.भूषण हर्णे,श्रीम.प्रिया गोसावी (शिक्षक)या दात्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी पं .स.कणकवली तर्फे किल्ले स्पर्धा,सकल मराठा समाज वक्तृत्व विजेते कु.आदिती म्हाडेश्वर,समीक्षा चव्हाण,वैष्णवी सुतार.इंग्रजी कविता गायन जिल्हास्तरीय विजेते कु.समीक्षा गोसावी,कु.रिया परब.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना शिवानी साहित्य मंच व श्री.विजय गोसावी यांजकडून वही-पेन देत गौरविले. या शाळेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा एक एक टप्पा पार केला आहे.जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा,१००%सा.फु.द.पा.शाळा,मानवता जपणारी शाळा,प्रगत शाळा अशा अनेक गुणांनी ही शाळा शोभिवंत आहे.असे गौरवोद्गार श्री.किशोर गवस यांनी व्यक्त केले. सौ.जुहिली सावंत यांनी पुरस्कार प्रदान करणारे प्रितगंध फाउंडेशनचे श्री.संतोष म्हाडेश्वर यांचे आभार मानले.तिवरे खालचीवाडी शाळेने कोविड काळात जे शैक्षणिक कार्य केले,ते मी जवळून पाहिलं आहे. गौरवपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थी करत आहेत.सायबर सुरक्षा,बालदिन ,हात धुवा दिन,बालिका दिन अशा स्पर्धांमध्ये मुले सहभाग घेत आहेत.ही कौतुकास्पद बाब आहे.अशा गोड शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.हेमंत राणे ,निवेदन-संदीप कदम,तर आभार श्री.विजय मेस्त्री यांनी मानले. या कार्यक्रमाला सौ.वेदिका परब,श्री.संतोष शिरसाट,श्रीम.विजया सावंत,शाळा व्य.स.व पालक संघाचे सहकार्य लाभले.