अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेच्या सततच्या पाठपुराव्याला यश..
वेंगुर्ला /-
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासमवेत कार्यालयात नुकतीच सभा संपन्न झाली.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांपैकी चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी एकूण १२ प्रस्तावांपैकी ८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.किरकोळ त्रुटींमुळे ४ प्रस्तावांना आक्षेप लागून परत आले होते.त्यांची पुर्तता करून जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळताच वेतननिश्चिती करून संबंधितांना लाभ देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरून आलेले पत्र चटोपाध्याय वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणी पात्र शिक्षकांची यादी कार्यालयाने तयार करून केंद्रमुखांमार्फत संबंधितांना द्यावी. जेणेकरून पात्र शिक्षक वेळीच प्रस्ताव सादर करतील व चुकिचे प्रस्ताव येणार नाहीत. अशी मागणी करण्यात आली. यानंतर तशी यादी देण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.
महाराष्ट्र दर्शन एकही देयक प्रलंबित नाही.वैद्यकिय देयके १४ मंजूर असून मार्च अखेर खर्च पडतील. आक्षेप लागलेली १२ देयके पूर्ततेसाठी संबंधित शिक्षकांकडे. उर्वरीत ७ देयके मंजूरीसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्यात आली आहेत. काही शिक्षकांच्या देयकांमधील त्रूटी संदर्भात चर्चा करण्यात आली.इतर किरकोळ वेतन फरक असलेल्या शिक्षकांचे वेतन फरक काढण्यात आले आहेत.स्थायी आदेशाची प्रत केंद्रप्रमुखांमार्फत संबंधितांना पुरविण्यात येईल.सेवापुस्तके अद्ययावत करण्यात आली आहेत.कामगिरी शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार शाळा देण्यात येतील.समायोजन कार्यक्रम जिल्हास्तरावरून आदेश येताच राबविण्यात येईल.लाॅकडाऊन काळात गावी अडकलेल्या शिक्षकांच्या रजा भरून घेण्यात आल्या आहेत. जूनचे प्रलंबित वेतन मार्च अखेर देण्यात येईल.पगार पत्रकाची प्रत केंद्रप्रमुखांमार्फत शाळांना पुरविण्यात येईल.एमएससीआयटी
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन फरक काढण्यात येतील.
अनुदान खर्चाबाबतची निकषांची तसेच इतर पत्रांच्या प्रती शाळांना देण्यात येतील.
संघटनेला चर्चेसाठी बोलावताना केवळ फोन करून निमंत्रित न करता लेखी पत्राने कळविण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली. पुढील सभेचे लेखी पत्र देण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.शिक्षकांचे अजूनही काही प्रश्न किंवा समस्या असल्यास कार्यालयाच्या संघटनेने कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्या,असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी केले. तसेच लाॅकडाऊन काळात शाळा बंद असताना शिक्षण सुरू रहावे यासाठी शिक्षक संघाने राबविलेल्या विविध स्पर्धांबाबत पदाधिकारी यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले.
शिक्षक संघाच्या तालुका व जिल्हास्तरावरील सततच्या पाठपुराव्यामुळे व शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.उर्वरित प्रलंबित प्रश्नांची लवकरच सोडवणूक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून गटशिक्षणाधिकारी व वेंगुर्ले शिक्षण विभागाच्या कामाबद्दल शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या सभेला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,शिक्षण विस्तार अधिकारी वंदना परब, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक झिलू गोसावी वरिष्ठ लिपीक नवार,लिपीक महेश नाईक, मुकुल सातार्डेकर आदी उपस्थित होते.