मच्छीमारांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेण्याची मागणी
उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांच्याशीही आमदार व आयुक्तांनी केली फोनद्वारे चर्चा..
सिंधुदुर्ग /-
मालवण येथील मत्स्य कार्यालयासमोर गेले सहा दिवस सुरू असलेल्या पारंपारिक मच्छीमारांच्या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मच्छीमारांच्या संपर्कात राहून समस्या सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची मुंबईत भेट घेतली.
यावेळी उपोषणकर्त्या मच्छीमारांच्या मागण्यांविषयी चर्चा केली. याप्रसंगी मत्स्य विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सिंधुदुर्ग सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त नागनाथ भादुले हेही उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांच्या प्रमुख मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या तसेच मालवण येथील उपोषणकर्त्या मच्छीमारांच्या वतीने मिथुन मालंडकर यांच्याशी आमदार श्री.नाईक यांनी फोनद्वारे चर्चा केली. तसेच आयुक्तांशीही चर्चा घडवून आणली,या पार्श्वभूमीवर मच्छीमारांची मागणी असलेली कारवाई तसेच लेखी पत्र मत्स्य आयुक्त यांनी देण्याची तयारी दर्शवली आहे.