कुडाळ मालवण मधील चाकरमान्यांची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक संपन्न..
कुडाळ /-
कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी शिवसेना भवन दादर मुंबई येथे संपन्न झाली.यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कुडाळ मालवण मधील गावातील विविध विकास कामांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. १५० ते २०० चाकरमान्यांनी उपस्थित राहून आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गावातील विकास कामांसंदर्भात सकारात्मकता दर्शविली.
मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील चाकरमान्यांच्या विकासात्मक संकल्पना, कुडाळ मालवण तालुक्यांमधील गावातील विकास कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने हि बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. वैभव नाईक यांनी प्रत्येकाशी चर्चा करून गावातील विकास कामे जाणून घेत विकासकामांची निवेदने स्वीकारून ती कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. बैठकीला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.चाकरमान्यांच्या मागणीवरून दर दोन महिन्यांनी बैठक घेणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
चाकरमान्यांसाठी वेळ देऊन त्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेणारे वैभव नाईक हे एकमेव आमदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी व्यक्त करत केली. कोरोणाचे नियम, अटीं, सोशल डिस्टनसिंगचे पालन करून ही बैठक घेण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था व विविध संस्थांचे पदाधिकारी व मुंबईत वास्तव्यास असलेले कुडाळ मालवण मतदारसंघातील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .