आवश्यक नवीन कामांसोबत चालू वर्षातील अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील भरीव तरतूद..

कुडाळ /-

कुडाळ मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पूल बांधणे, धुपप्रतीबंधक बंधारे बांधणे, संरक्षक बंधारा बांधणे आदी कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चालू वर्षातील मंजूर परंतु अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील वाढीव व उर्वरीत निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम विभागाचे सचिव देबडवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

*अर्थसंकल्पीय तरतूद २०२१ अंतर्गत नवीन मंजूर कामे व निधी पुढीलप्रमाणे…*

१)हडी पाणखोल जुआ ता.मालवण जि. सिंधुदुर्ग येथे संरक्षक बंधारा बाधणे निधी २ कोटी रु.

२)मसुरकर जुवा ता.मालवण जि. सिंधुदुर्ग येथे समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बाधणे निधी ३ कोटी ४८ लाख रु.

३) करंजा बंदर ते नारायण कुबल यांच्या घरापर्यंत ता. मालवण येथे धुपप्रतीबंधक बंधारा बांधणे निधी २ कोटी रु.

४) सावंतवाडी तालुक्यातील झाराप आकेरी सावंतवाडी बांदा दोडामार्ग आयी रस्ता रामा 186 मध्ये साईडपट्टीचे रुंदीकरण व सुधारणा करणे निधी ३ कोटी ५० लाख रु.

५) कुडाळ तालुक्यातील राठीवडे हिवाळे ओवळीये कसाल ओसरगाव आंब्रड कळसुली प्रजिमा ३० मध्ये कॉजवेच्या ठिकाणी पूल बांधणे निधी ८० लाख रु.

६) मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मागवणे मसुरे बांदीवडे आडवली भटवाडी रस्ता प्रजिमा 52 मध्ये लहान पूलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे निधी २ कोटी ०२ लाख ३०हजार रु.

७) कणकवली तालुक्यातील वागदे हळवल शिरवल कळसुली रस्ता प्रजिमा २६ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे निधी १ कोटी ८८ लाख रु.

८) कुडाळ तालुक्यातील पिंगुळी नेरूर (माणकादेवी) मार्ग प्रजिमा ४६ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी १५ लाख रु.

९) कुडाळ तालुक्यातील चौके धामापूर कुडाळ मार्ग प्रजिमा ४१ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ३ कोटी ५० लाख रु.

१०) कुडाळ तालुक्यातील नेरूर वालावल चेंदवण कवठी रस्ता प्रजिमा ४५ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी २ कोटी ४० लाख रु.

११) कुडाळ तालुक्यातील कुडाळ पावशी घावनळे आंबेरी माणगाव कुणकेरी रस्ता प्रजिमा ४० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी ४७ लाख रु.

१२) मालवण तालुक्यातील काळसे वराड पेंडूर कट्टा गुरामवाड गोळवण वाडाचापाट मसदे मसुरे कावा प्रजिमा ३४ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ४ कोटी १७ लाख रु.

१३) मालवण तालुक्यातील सुकळवाड तळगाव बाव मार्ग प्रजिमा २७ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ३ कोटी रु.

१४) कुडाळ तालुक्यातील भरणी आगारवाडी ग्रा.मा. क्र. १२ रस्त्यावर लहान पूल बांधणे निधी १ कोटी २० लाख ७३ हजार रु. या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली असून याव्यतिरिक्त अगोदर मंजूर झालेल्या कामांसाठी देखील वाढीव व उर्वरित निधीची भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page