कुडाळ /-

महसूल प्रशासनाकडून जिल्हावासियांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.तर आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडी मार्फत लढविण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.येथील एमआयडीसी विश्रामगृहावर शनिवारी सायंकाळी माज विकास आघाडीची बैठक झाली या बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत घेतली यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत अरुण दुधवडकर माजी मंत्री प्रवीण भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे जिल्हा बँकेचे संचालक व्हीक्टरडॉन्टस, एमके गावडे अतुल रावराणे संदेश पारकर प्रकाश जैतापकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाविकास आघाडी बाबत आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणुकीबाबत चर्चा झाली निवडणुका महाविकास आघाडी बाबत लढवण्याचामानस असल्याचे सांगितले यावर लवकरच निर्णय होईल असे त्यांनी सांगितले आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही आम्ही डायरेक्ट लढून जिल्हा परिषद ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले माजी खासदार निलेश राणे यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले यापुढे महसूल विभागाकडून जिल्हावासियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली असल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांनी मंडल अधिकारी तलाठी यांच्याकडून पैसे घेऊन कामे केली जातात याचा जनतेला त्रास होतो याबाबत तहसीलदारांवर हल्ला बोल केला होता याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी यापुढे महसूल विभागाकडून जनतेला कोणताही त्रास होणार नाही असे स्पष्ट केले जनतेनेही याबाबत तक्रारी देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.विमानतळाबाबत काढून घेण्याबाबत आम्ही निर्वाणीचा इशारा दिला असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page