कुडाळ /-
कुडाळ शहरातील ग्रामिण रूग्णालय समोर एका मोटर सायकल स्वाराने दुसर्या एका मोटरसायकलला ठोकर दिली. या अपघातात समोरील मोटरसायकल स्वार रस्त्यावर खाली पडल्यानंतर काही अंतर फरफटत गेला. मात्र सुदैवाने या दुचाकीस्वाराला काहीच लागले नाही.मात्र या अपघातात या युवकाच्या दुचाकीचे मात्र नुकसान झाले. यासाठी दुरूस्तीचा खर्च जास्त असल्याचे समजताच ठोकणार्रा युवकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र या अपघातानंतर या युवकाचा मोबाईल घटनास्थळी सापडला.आणि हा युवक आयताच जाळ्यात सापडला.त्यामुळे त्याला फोन करून तात्काळ पोलीस ठाण्यात बोलवले.आता या युवकाला या गाडीचा संपुर्ण खर्च करावा लागणार आहे.अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.