कुडाळ /-
झाराप तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात आज दुपारनंतर झाला आहे.
दुचाकीस्वार वसंत निळकंठ धुरी रा. साळगाव हा आपल्या ताब्यातील दुचाकीने आपल्या कामावरून साळगांव येथील आपल्या घरी जात होता. यावेळी स्प्लेंडर दुचाकीस्वार अशोक उर्फ केशव तातू होडावडेकर वय ४२ हे आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने विरूद्ध दिशेने येत अचानक धुरी यांच्या मोटरसायकल समोर आले. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरा समोर ठोकर बसली. यात यातील दोघांनाही दुखापत झाली. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
यातील श्री होडावडेकर यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद ज्युपिटर दुचाकीस्वार वसंत निळकंठ धुरी रा साळगाव याने कुडाळ पोलिसात दिली आहे. या प्रकरणी दोन्ही वाहनांच्या व तसेच दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अशोक होडावडेकर यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.