कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली..

कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली..

कुडाळ /-

जिल्हा रुग्णालयात कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली.दुसरी लस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने शासनामार्फत कोरोनाची लस देण्यात येत आहे. प्राथमिक टप्प्यात जे शासकीय अधिकारी कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असतात अशांना ही कोरोनाची लस प्रथम प्राधान्याने देण्यात येत आहे. याअनुषंगाने कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी यांनीही ही पहिली लस घेतली. उर्वरित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना गुरुवारी ही लस देण्यात येणार आहे. बुधवारी पहिली लस देण्यात आली असून दुसरी लस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..