मालवण /-
डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत बांगीवाडा समाजमंदिर येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पी.के.चौकेकर, अमित खोत, महेश कदम, सिद्धेश आचरेकर, भूषण मेतर, वैभव वळंजू, अंजना सामंत, एस.एस.कासले आदि उपस्थित होते. यावेळी पी.के.चौकेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर अमित खोत यांनी दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. याप्रसंगी दहा वर्षे विविध कार्यक्रमात संत गाडगेबाबा यांची भूमिका साकारणारे वायरी आडवण येथील जेष्ठ कलावंत शशिकांत चव्हाण यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.