वेंगुर्ला /-

देशात १८ राज्यात एकाच वेळी ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडीत ४२ हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदींचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव समृद्ध ,संपन्न व शक्तीशाली होणे गरजेचे आहे. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने गावातील लोक मोठमोठ्या शहरात रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झाले आहेत. यासाठी गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी केले.सोमवारी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण -पेंडूर येथील कल्पतरू औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता.दरम्यान हा ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम वेंगुर्ले महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ले येथील सभागृहात संपन्न झाला.यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक – कृषीभूषण एम. के. गावडे, महिला काथ्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कल्पतरू क्वायर क्लस्टरच्या चेअरमन अरुणा सावंत,उपाध्यक्ष श्रीमती परब,सचिव सौ.पेंडुरकर,सर्व संचालक , उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, गीता परब,श्रुती रेडकर,राखी कलंगुटकर,वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, अश्विनी पाटील आदींसह , सर्व एस.पी.व्ही.मेम्बर्स,महिला आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, देशाच्या जीडीपी मध्ये ३० टक्के वाटा हा क्लस्टरचा असून याचे प्रमाण ४० टक्के पर्यत नेण्याचा उद्देश आहे. तसेच देशाच्या पूर्ण आयातमध्ये ४८ टक्के वाटा एमएसएमई चा असून तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच शहरातील व गावातील विकास यामध्ये समन्वय दिसून येत नाही. गावात आवश्यक तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही.त्यामुळे गावातील लोक रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत. त्यासाठी गावात असणाऱ्या कच्यामालाच्या अनुषंगाने त्या त्या गावामध्ये क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. तसेच अमेझॉन प्रमाणे एमएसएमई व खादीग्रामोद्योगाचे वेबसाईटवर पोर्टल सुरू करण्याचा आपला विचार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page