कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाची संख्या वाढत आहेत.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करावे.त्याचबरोबर मास्कचा वापर अत्यंत आवश्यक आहे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये म्हणून हि काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई,नगरपंचायत चे मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन गाढवे उपस्थित होते.प्रशासनाचे चारही विभागामार्फत हे आवाहन केले आहे. यावेळी तहसीलदार अमोल पाठक म्हणाले, नागरीकांनी प्रशासनाला नियम अटींचे पालन करून सहकार्य करावे. लॉकडाऊन होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पाठक यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक कोरे म्हणाले, जे लोक मास्क वापरत नाहीत अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीसांना देण्यात आल्या आहेत. तर सहाय्यक गटविकास अधिकारी भोई म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर देखिल अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. मोठ्या ग्रामपंचायत मध्ये ग्राम विस्तार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हि मोहीम राबविण्यात येणार आहे.
नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी गाढवे म्हणाले, संपूर्ण शहरात पथके नेमून मास्क न वापरण्यार्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.आतापर्यंत ५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.