मसुरे /-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विद्या मंदिर शिरवंडे येथील मैदानावर संपन्न झाल्या. या मैदानी स्पर्धांमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये दहा वर्षाखालील मुलगे या गटामध्ये कुमार रुद्र रुपेश परब याने 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि लांब उडी या तिनही खेळ प्रकारात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक* मिळविला आहे. तसेच बारा वर्षाखालील मुलगे या मध्ये गोळा फेक प्रकारात कृणाल नारायण परब याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर संचित सत्यवान परब यांने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच बारा वर्षाखालील मुलींमध्ये पन्नास मीटर धावणे या खेळ प्रकारात कुमारी समीरा संतोष जाधव हिने प्रथम क्रमांक तर कुमारी समीक्षा दत्ताराम शिरवंडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, सन्मानपत्र आणि सहभागी पत्र देऊन गौरविण्यात आले. या उज्वल यशाबद्दल सभापती श्री. अजिंक्य पाताडे, उपसभापती श्री. सतीश परुळेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, श्रावण सरपंच श्री.प्रशांत परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शिवराम परब, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष श्री.कृष्णा हरणे, पोलीस पाटील श्री.धाकु दळवी,श्री.उमेश श्रावणकर, श्रावण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नितीन कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्री.स्मिता किंजवडेकर, सर्व शिक्षक, सर्व पालक, श्रावण गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत श्रावण, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, आणि माता पालक संघ यांनी या सर्व विजेत्या स्पर्धकांचे, शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
या सर्व खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी श्रावण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. स्मिता किंजवडेकर तसेच शाळेतील शिक्षक श्री.विनायक हरकुळकर, श्रीम. साक्षी कुबल, श्रीम. रागिनी ठाकूर, श्री.सचिन घोटाळे, श्रीम. रोहिणी पवार, श्रीम. सुवर्णा दळवी, अध्यक्ष श्री. शिवराम परब, श्री.उमेश श्रावणकर आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.