मालवण /-

तालुका शिवसेनेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तीस आम. नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेल्या शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती निमित्त आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ले परिसर शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, विजय पालव, सेजल परब, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, शिल्पा खोत, भाई कासवकर, सन्मेष परब, कमलाकर गावडे, यशवंत गावकर, अमित भोगले, राहुल सावंत, पॉली गिरकर, देवा रेवडेकर, दर्शन म्हाडगुत, महेंद्र म्हाडगूत, उमेश मांजरेकर, पंकज सादये, अमोल वस्त, भाऊ परब, राजू नार्वेकर, श्री. रेवडेकर, तपस्वी मयेकर, किसन मांजरेकर, किल्ले होडी प्रवाशी संघटनेचे स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, राजू पराडकर, बाळा तारी, आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदर जेटी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page