कुडाळ /-
१९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाने यावर्षीची शिवजयंती मनोहर गडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली.
या मोहिमेमध्ये मनसंतोष गडावर जाणाऱ्या माती व दगडांनी गायब झालेल्या पायऱ्या मोकळ्या करून स्वच्छता करण्यात आली. यावेळी अवघड चढण असलेल्या मनसंतोष गडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, रोहन राऊळ, प्रणय राऊळ व पंकज गावडे या मावळ्यांनी यशस्वी चढाई केली.
त्यानंतर मनोहर गडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान ने लावलेल्या झाडच्या जाळ्या व्यवस्थित लावणे, पाणी घालणे इत्यादी कामे करण्यात आली.
औदुंबराच्या झाडाखाली महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. ही मोहीम दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या गणेश नाईक, समिल नाईक, वेदिका मांडकुलकर, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, पंकज गावडे, सुशील घाग, राणी मांडकुलकर, सोनाली परुळेकर इत्यादी मावळ्यांनी पूर्ण केली.