मसुरे /-
मालवण तालुक्यातील भगवंतगड किल्ला येथे
चिंदर सेवा संघ, चिंदर ग्रामस्थ, शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ल्यावरचे आराध्य दैवत श्री देव सिध्देश्वर येथे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आय .पी.एस् सुब्रमण्य केळकर यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष संदिप पारकर यांनी केले उपसरपंच दिपक सुर्वे यांचे स्वागत खजिनदार गणेश गोगटे यांनी केले. कील्लेदार जुवेकर, सदानंद गोसावी,पप्पु परुळेकर,भाटकर,प्रकाश मेस्री, संतोष अपराज,केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, करवडकर,संभाजी पवार,प्रविण तेली, खजिनदार गणेश गोगटे, सचिव ओमकार गोलतकर, प्रसाद टोपले, सहसचिव सचिन चिंदरकर, भूषण दत्तदास, उपाध्यक्ष विवेक(राजु)परब,मारुती हडकर, प्रथमेश तावडे, सिद्धेश गोलतकर, प्रणित तावडे विनायक मसुरकर दिनेश पाताडे आदी उपस्थित होते.मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरवात पोवाड्याने झाली.
प्रथम पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर नंबर१च्या
गौरव दत्तदास, अथर्व तावडे, नमित घाडी, समिरा घाडी, दुर्वेश अपराज यांनी पोवाडा सादर केला व शिवकालीन वातावरण निर्मिती केली.
दुसरा पोवाडा शाळा चिंदर सडेवाडीची विद्यार्थीनी कु. स्वप्नाली विरकर हिने सादर केला.
यानंतर शाळा पडेकापचे विद्यार्थी हर्षद वरक, सौरभ जंगले, वैष्णवी जंगले,वेदांगी जंगले, मधुकर काळे यांनी सादर केला.
एकच राजा ईथे जन्मला हे सुंदर समुहान शाळा चिंदर भगवंतगडच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या जिवनावर वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आली होती..या स्पर्धेत कु.मंजुनाथ श.घागरे सडेवाडी शाळा इ.४थी,
कु.संस्कार सं. पवार सडेवाडी शाळा इ.४थी,कु.सायली ना.विरकर सडेवाडी शाळा इ.४थी,कु.श्रावणी स्वं. सुर्वे शाळा सडेवाडी इ.२री,कु.दुर्गा श्रीपाद म्हापसेकर शाळा पालकरवाडी इ.५वी,कु.समर्थ शिवानंद सोलापूरे शाळा पालकरवाडी इ.२री,
कु.किरण उमेश जिकमडे शाळा कुभांरवाडी इ.५वी,
कु.साजिरी सुनिल चिंदरकर शाळा चिंदर कुंभारवाडी,
कु.गौरव रणजित दत्तदास शाळा चिंदर नं१ इ ७वी,
कु.आर्या बागवेचिंदर बाजार इ.४थी,कु.वेदांगी संदेश चेंदवणकर चिंदर बाजार इ ४थी,
कु.किंजल आनंद परब भगवंतगड इ ४थी या स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक
कु.दुर्गा श्रीपाद म्हापसेकर (शाळा चिंदर पालकरवाडी) हिने
व्दितिय क्रमांक
कु.सायली नागेश विरकर (शाळा चिंदर सडेवाडी)
तृतीय क्रमांक
कु.किंजल आनंद परब (शाळा चिंदर भगवंतगड) यांनी पटकावला.
सर्वांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
परीक्षक म्हणून श्री प्रविण आत्माराम तेली, नवनाथ भोळे , शुभांगी मेश्राम यांनी काम पाहिले.
यावेळी कु.हर्षाली गणपत कानविंदे हिने स्वतः बनवलेली शिवप्रतिमा चिंदर नंबर१ शाळेला शिक्षकांकडे भेट दिली.
स्वागत व आभार चिंदर सेवा संघाचे ओमकार गोलतकर यांनी मानले