कुडाळ /-
तारकर्ली येथील राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची नृत्यांगना मृणाल सावंत ही विजेती ठरली आहे. तारकर्ली मंडळ यांच्यावतीने राज्यस्तरीय एकेरी नृत्यस्पर्धेचे आयोजन श्री महापुरुष रंगमंचावर करण्यात आले होते स्पर्धेत द्वितीय समर्थ गवंडी तृतीय नंदिनी बिले हिने मिळवला श्री एकेरी नृत्य स्पर्धांसह विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये सात हजार, रुपये पाच हजार ,रुपये तीन हजार रुपये ,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. परीक्षण नृत्य परिषद पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे कोल्हापूर, सचिव सागर सारंग यांनी केले. राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेसह अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा ,हॉलीबॉल क्रिकेट स्पर्धा ,दहावी, बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, कोरोना महामारी संकटात अतिशय चांगली सेवा बजावणारे डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशा स्वयंसेविका, यांना कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सतीश टिकम ,तारकर्ली उपसरपंच अंकुश कुबल , किशोर कुबल, निवृत्ती कोळबकर, मुंबई सभासद शांताराम कुबल ,कांचन खराडे ,सुनिल कुबल ,कुणाल बापर्डेकर मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन किशोर कुबल व कांचन खराडे यांनी केले. नृत्य स्पर्धेत 19 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.