वेंगुर्ला /-
वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.प.वजराट येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी जनरल सर्जन,स्त्री रोग तज्ञ,हृदयरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ व अन्य डॉक्टर उपस्थित राहून वैद्यकीय तपासणी करणार आहे.यावेळी शुगर तपासणी, ब्लडप्रेशर व इतर तपासण्या मोफत तसेच नेत्रतपासणी करून मोफत चष्मेवाटप करण्यात येणार आहेत.यावेळी जुने वैद्यकीय रिपोर्टसह कोव्हिड १९ चे पालन करून आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन वजराट सरपंच महेश राणे यांनी केले आहे.