वेंगुर्ला /-
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभाग विभागामार्फत बुधवारी २० जानेवारी वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२० -२१ करिता “आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार” जिल्हा परिषद ओरोस येथे प्रदान करण्यात आले.
यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर टाक अंगणवाडी सेविका मेघा मयेकर व मदतनीस शोभा कासकर,आडेली देऊळवाडी अंगणवाडी सेविका माधवी मधुकर ठाकूर व मदतनीस प्रणाली धरणे,म्हापण चव्हाणवाडी अंगणवाडी सेविका मानसी चव्हाण व मदतनीस नम्रता चव्हाण,पाल कुलदेव अंगणवाडी सेविका रेणुका कांबळे व मदतनीस स्वाती परब ,तसेच तालुक्यातील
तुळस कणकेवाडी मिनी अंगणवाडी सेविका समिक्षा
मळगावकर याना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय बचत पत्र,शाल,प्रशस्तीपत्रक,गौरवपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा समिर नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर,महिला व बालविकास समिती सभापती माधुरी बांदेकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमोल पाटील,
शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके,समाजकल्याण समिती सभापती शारदा कांबळे,सदस्य,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,विनित म्हात्रे,वेंगुर्ले सीडीपीओ शर्मिला सामंत आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभाग विभागाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना क्षेत्रात उत्कृष्ट व प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले.