वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात कृषिपंपाची कनेक्शनस भरपूर प्रमाणात आहेत.शासनाच्या काही अटींमुळे त्या संपूर्ण बंद होती.इतर तालुक्यात त्या सुरू आहेत.परंतु वेंगुर्ला तालुक्यात बरीच वर्षे शेतीपंप कनेक्शन देण्यास सुरुवात का झाली नाहीत? याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर कनेक्शन देण्यात सुरुवात करण्यात यावी, असा ठराव माजी सभापती व पं. स.सदस्य सुनिल मोरजकर यांनी आज झालेल्या पं. स.च्या मासिक सभेत मांडला.यावेळी त्यांनी विविध सूचना मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाली.
या सभेस गटविकास अधिकारी उमा पाटील, पं. स.सदस्य सुनिल मोरजकर,मंगेश कामत,साक्षी कुबल,गौरवी मडवळ, स्मिता दामले,विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
पं. स.नूतन इमारत उदघाटन कार्यक्रम खर्चासंदर्भात सभागृहात विषय आला असता स्मिता दामले यांनी उदघाटन खर्च सेस अनुदान मधून करण्यास आक्षेप घेतला.सदर इमारतीत विद्युतचे ,फर्निचर काम अपूर्ण आहेत.पं. स.ची महत्वाची कागदपत्रे, अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी फर्निचरचे काम लवकरात पूर्ण करा,असे त्यांनी सांगितले. त्यावेळी पं. स.सेस मधून ५० हजार रु.खर्च करण्याचे ठरले होते.यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर
पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमासाठी १ लाख रुपयांची तरतूद करण्याचे ठरले.यावेळी सिद्धेश परब यांनी तालुक्यातील नोकरदार वर्ग व अन्य नागरिकांच्या गैरसोयीबाबत सायंकाळी पणजी ते वेंगुर्ला च्या दोन बसेस सोडण्यात याव्यात,याबाबत एस.टी.च्या पदाधिकारी यांना सूचना केल्या.शिरोडा देऊळवाडा येथील लोकांना सध्या भाजीमार्केट मधील ट्रान्सफॉर्मर मधून वीजपुरवठा करण्यात येत आहे,तो स्वामी समर्थ ट्रान्सफॉर्मर वरून करण्यात यावा,अशी सूचना सिद्धेश परब यांनी संबंधित पदाधिकारी यांना केल्या.यावेळी १५ वा वित्त आयोग,२५-१५ तील कामे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली.शालेय पोषण आहार आढावा घेण्यात आला.
सुनिल मोरजकर यांनी बर्ड फ्ल्यू बाबत प्रतिबंधकल लस उपलब्धता,१५ वा वित्त आयोग कामे याबाबत कामासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत,परंतु प्रशासकीय मान्यता मिळालेली नाहीत,याबाबत सूचना मांडल्या.कोचरा येथील संजीवनी हळदणकर यांचे घर अतिवृष्टीत कोसळून बेघर झाल्या आहेत.सध्या त्या झोपडीत राहत असून घरकुलसाठी ग्रा.प.मार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.शासनाच्या ड यादीत तिचे नाव समाविष्ट आहे.त्यांना निवाऱ्याची त्वरित आवश्यकता असून वरिष्ठ स्तरावरून त्यांना लवकर घरकुल प्राप्त व्हावे,अशी मागणी सदस्या गौरवी मडवळ यांनी केली.म्हापण,कोचरा,केळुस भागातील पंतप्रधान आवास योजना परिपूर्ण प्रस्ताव जि. प.कडे पाठविणे बाबतही त्यांनी सूचना मांडली.तसेच विविध कामासंदर्भात ग्रा.प.कडून त्या त्या भागातील आजी – माजी प्रमुख लोकप्रतिनिधी याना प्रामुख्याने माहिती देण्यात यावी,अशी सूचना मांडली. याबाबत ग्रा.प.ना कळविण्यात येईल,असे बीडीओ उमा पाटील यांनी स्पष्ट केले.घरकुल विषयावर तालुक्यातील बेघर गरीब व गरजूना घरकुलचा लाभ कधी मिळणार ? असा प्रश्न मंगेश कामत यांनी उपस्थित करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी व निधी देण्यात यावा,अशी सूचना त्यांनी मांडली.पं. स. सभागृह आवारात घरकुले प्रतिकृती जागेबाबत बीडीओनी निर्णय घ्यावा,अशी सूचना कामत यांनी मांडली.तालुक्यातील एस.टी.बस सेवा सुरळीत करावीत,अशी सूचना साक्षी कुबल यांनी मांडली.
दरम्यान कोव्हिड
लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली असून
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी माहिती दिली.याबाबतचे नियोजन आरोग्य खात्यामार्फत पूर्ण झाले आहे,अशी माहिती डॉ.माईणकर यांनी दिली.यासाठी पं. स.चे पूर्ण सहकार्य राहील,अशी ग्वाही सिद्धेश परब यांनी दिली.दरम्यान विविध सूचना बाबत ग.वि. अधिकारी उमा पाटील यांनी संबंधित विभागांना पत्र – सूचना देण्यात येतील असे सांगितले.सिद्धेश परब संबंधित विविध खात्याच्या उपस्थित अधिकाऱ्यांना तालुक्यातील अपूर्ण कामे तसेच सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.