मसुरे /-
आचरे टेंबली येथे रस्त्यात सापडेलेले पैशाचे पॉकेट मुळ मालकाचा शेध घेत परत करण्याचा प्रामाणिकपणा आचरे हिर्लेवाडी येथील युवक अक्षय शिर्सेकर याने दाखवून दिला आहे. हिंदळे मोर्वे शाळेचे शिक्षक सचिन तवटे यांचे पॉकेट पेट्रोलपंप ते आचरा तिठा या दरम्यान पडले होते. सदर पॉकेट मध्ये रोख रक्कम, लायसन्स, आधार कार्ड तसेच इतर महत्वाची कागदपत्रे होती. दरम्यान या मार्गावरुन प्रवास करताना अक्षय शिर्सेकर याला रस्त्यात सदर पॉकेट दिसुन आल्या नंतर त्याने ते पॉकेट आचरे तिठा येथील हर्षद धुरी याच्या जवळ देत मुळ मालका पर्यंत पोहोच करण्यास सांगीतले. लायसन्स वरील नावावरुन सचिन तवटे याना संपर्क साधण्यात आला व पॉकेट परत करण्यात आले. बक्षिस म्हणुन देऊ केलीली रक्कम सुद्धा अक्षय याने नम्रता पुर्वक नाकारली. अक्षय याच्या प्रामाणीक पणा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.