सावंतवाडी /-

जुना रेल्वे स्टेशन फाटक ते शिरोडा-सावंतवाडी हा जोड रस्ता अतिशय धोकादायक झाला असून या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे साचलेल्या पाण्यामुळे चिखलमय झाला आहे. या ठिकाणी अपघाताची असल्याने लवकरात लवकर यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आठ दिवसात युवा सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज निवेदनाद्वारे युवा सेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांना दिला.

युवासेना उपजिल्हा अधिकारी सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना उपतालुका अधिकारी विनायक सावंत, युवासेना सावंतवाडी उपतालुका अधिकारी आदित्य आरेकर, आंबोली युवासेना उपविभाग अधिकारी मायकल डिसोझा, विशाल बांदेकर आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान तत्पूर्वी या मार्गाची युवासेना उपजिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी घटनास्थळी जात या रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे जुना रेल्वे फाटक ते महामार्ग दरम्यान पडत असलेली मायनिंग मातीमुळे हा मार्ग खड्डेमय झाला असून त्यातच ही माती पावसाच्या पाण्यामुळे सावंतवाडी शिरोडा मार्गावरील रस्त्यावर येऊन पूर्णता चिखल झाला आहे. यामुळे शिरोडयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना उजव्या बाजूला वाहन चालवावे लागत आहे. यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चिखलातून वाहन हाकण्यात दुचाकी स्लीप होऊन पडण्याची ही भीती निर्माण झाली आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची शिष्टमंडळात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी वस्तुस्थिती मांडली. ही समस्या न सोडविल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. असे यावेळी सांगितले. यासोबतच त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अपघाताची संख्या टाळण्यासाठी नवीन साईड पट्टी मारण्याची मागणी यावेळी केली. ज्या रस्त्यावर गतिरोधक असून त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली जाते विचार करून लवकरात लवकर पांढरे पट्टे माराव्यात अशी मागणी यावेळी केली यासोबतच ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर दिशा दर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी असे यावेळी कार्यकारी अभियंता यांना सांगितले या सर्व मागण्यांचा विचार करून आठ दिवसाच्या आत कार्यवाही सुरुवात करावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page