कुडाळ /-
अमली पदार्थ प्रकरणात अडकलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कुडाळवासीयांना दिली. येथील बाजारपेठेत गांजा विक्रीप्रकरणी दोघांना पकडल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी त्यांनी तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, नगराध्यक्ष ओंकार तेली, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, अॅड. राजीव बिले तसेच कुडाळातील इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे. मोठ्या प्रमाणात युवक-युवती व्यसनाधीन होत आहेत.सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी संवाद साधला,या बैठकीला सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंकी, हे देखील कुडाळ पोलीस ठाण्यात उपस्थित होते.