वैभववाडीः
तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी एकूण १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले.तर आतापर्यंत १५६ अर्ज दाखल झाले आहेत.30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे मंगळवारी उमेदवार व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी तहसिल परिसरात मोठी गर्दी केली केली होती. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु होती.महा ई सेवा केंद्र व सेतु सुविधा केंद्र, संगणक सेंटर बाहेर दिवसभर गर्दी दिसत होती.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे.या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे.परंतु २७ डिसेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.२८ डिसेंबर ५ ग्रामपंचायतीतून २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यामध्ये सांगुळवाडी १, कोकिसरे ३, नाधवडे २, एडगाव ७, तर आचिर्णेतून १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तर मंगळवारी .१३ग्रामपंचायतीतून १२६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये सांगुळवाडी ९,कोकिसरे २६,खांबाळे ११, लोरे १२, नाधवडे १२, कुंभवडे १, एडगाव १७, मांगवली ६ भुईबावडा ६, सोनाळी १४, वेंगसर ७, ऐनारी ११, तर आचिर्णे १८ असे एकूण १२६ अर्ज दाखल झाले आहेत.
दोन दिवसात सर्वाधिक कोकिसरे ग्रामपंचायतीसाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत.त्यानंतर आचिर्णे ग्रामपंचायतीसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत.तर कुंभवडे ग्रामपंचायतीसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे.बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.