वेंगुर्ला /-
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने शहरात आज स्वछता अभियान राबविण्यात आले.आज सकाळी निमुसगा परिसर ते लाईटहाऊस तसेच दाभोली नाका ते निमुसगा या भागात हे अभियान राबविण्यात आले.यावेळी या अभियानात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,प्रितम गायकवाड,पंकज केळुसकर,सागर चौधरी,न.प.कर्मचारी आदीनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान राबविले.स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने
अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने
विविध उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी न.प.च्या सभेत सूचित केले होते.त्यानुसार आजप्रमाणे दर शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरात स्वछता अभियान राबविण्यात येणार आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छ भारत अभियानात अनेक पुरस्कार प्राप्त केले असून या अभियानातील सातत्य कायम टिकवून राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे,असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.