वैभववाडी : मांगवली येथील सामायिक घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस सहा जणांनी मारहाण केली. ही घटना 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.आरोपी अभिजीत अंकुश संसारे ,अनिकेत अंकुश संसारे ,तुषार व अन्य तीन अज्ञात व्यक्तीवर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मांगवली येथील संसारे कुटूंबियांचे सामायिक घर आहे.या सामायिक घराची देखभाल दुरुस्तीसाठी कुलमुखत्यार पत्र घर मालक धनंजय तोडकरी यांनी जगदीश शांताराम संसारे यांना दिले आहे.कुलमुखत्यारपत्र फिर्यादी याना दिले असता आरोपी अभिजीत अंकुश संसारे व अन्य सहा जणांनी जगदीश संसारे यांना विचारणा नकरता घराचे कुलूप तोडले,याची विचारणा करण्यास गेलेल्या जगदीश संसारे यांना मारहाण केली. या मध्ये फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत. अभिजित अंकुश संसारे ,अनिकेत अंकुश संसारे व अन्य चार जणावर वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 147 ,149, 504, 506 ,323 दाखल करण्यात आलेली आहेत.या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत.