सिंधुदूगनगरी /-
जिल्ल्हातील शिक्षकांच्या बाबतीत एकाधिकारशाही वापरून शिक्षकांना ऑनलाइन ऑफलाइन आदेश देणाऱ्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर करावी. याबाबत एका पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले असून याची तातडीने दखल घ्या असे कळविले आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषदे च्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांच्या ए काधीकारशाही विरोधात आज आंदोलन छेडले व या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही याबाबत तीव्र लढा उभारू असा इशारा दिला या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.यामुळे पा. शिक्षणाधिकारी एकनाथ अबोकर याची बदली अटळ आहे.