सिंधुदुर्गनगरी : कोव्हीड काळात केलेल्या कार्याबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटना, देव्या सुर्याजी गृपतर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आल असून रात्रंदिवस डॉक्टर आणि त्यांची टीम जीवाची बाजी लावून काम करत आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक कार्य करणाऱ्या या संघटनांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांचा सन्मान केला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, अर्चित पोकळे आदि उपस्थित होते.